प्रतिनिधी/ सातारा
औरंगाबाद येथे ऑल महाराष्ट्र टेंट असोसिएशनच्या तिस्रया वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये महाराष्ट्र झोनचे चेअरमन म्हणून कोल्हापूर जिल्हा मंडप असोशियनचे जिल्हाध्यक्ष सागर चव्हाण यांची निवड झाली. तसेच सातारा जिल्हा राज्य कार्यकारिणी संचालक म्हणून गोरखनाथ करपे त्यांची पुनश्च निवड करण्यात आली. तसेच सातारा जिल्हा मंडप आसोशियनचे जिल्हाअध्यक्ष रामभाऊ हादगे यांची सन 2021 आणि सन 2022 या वर्षांसाठी पुनश्च जिल्हाध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य प्रदेश मंडप असोसिएशनचे अध्यक्ष डडुसिंग पुरोहित यांच्या हस्ते नियुक्त पत्र देऊन निवड करण्यात आली.
वरील सर्व अभिनंदनीय निवडीबद्दल सातारा जिल्हा मंडप जिल्हा सचिव रमेश नाना साळुंके, जिल्हा खजिनदार राजू भोसले, जिल्हा संचालक अमित पवार आणि सर्व जिल्हा कार्यकारणी सदस्य संचालक यांच्यावतीने त्यांचे कौतुक करण्यात आले.









