ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट नावाचे विश्वस्त मंडळ स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा लोकसभेत केली. या ट्रस्टमध्ये 15 सदस्य असणार आहेत. या विश्वस्त मंडळाची स्थापना झाल्यानंतर केंद्र सरकारने या विश्वस्त मंडळाला 1 रुपयाचे रोख दान दिले. या ट्रस्टला मिळालेले हे पहिले दान आहे.
दरम्यान, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टद्वारे अयोध्येत भव्य राम मंदिर निर्मितीच्या दिशेने काम सुरू व्हावे या उद्देशाने केंद्र सरकारने विश्वस्त मंडळाला एक रुपयाचे दान देत दानाची सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने हे दान गृह मंत्रालयाचे सचिव डी. मुर्मू यांच्यामार्फत दिले.
यावेळी अधिकाऱयांनी सांगितले की, ट्रस्ट स्थावर मालमत्तेसह कोणत्याही अटीशिवाय कोणत्याही व्यक्तीकडून दान, अनुदान, योगदान घेऊ शकते.









