प्रतिनिधी / विटा
खानापूर तालुक्यातील बाणूरगड येथे राम मंदिर उभारणीसाठी माती कलश यात्रेचा शुभारंभ आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी शूरवीर बहिर्जी नाईक यांचे वंशज दादाराम जाधव, सामाजिक कार्यकर्ते हेमंतराव हरारे, कृती समितीचे अध्यक्ष मोहनराव मदने, क्षत्रिय रामवंशी समाज संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्राच्या उभारणीत महत्वाचे योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या पावन भूमीतील माती संकलित करण्यासाठी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ शूरवीर बहिर्जी नाईक यांच्या समधीस्थळी बाणूरगड येथे करण्यात आला. ही कलशयात्रा अयोध्या येथे रवाना होणार आहे. राममंदिर उभारणीसाठी हा पवित्र कलश प्रदान करण्यात येणार आहे, असे आमदार पडळकर यांनी सांगितले.








