नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
राम मंदिर संस्थानने मंदिरासाठी खरेदी केलेल्या जागेच्या कथित घोटाळ्यावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. अयोध्येतील राम मंदिर निर्मितीसाठीच्या जमीन व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्यांनी देणगी दिल्याची पावती दाखवावी आणि दिलेली देणगी परत घेऊन जावी, असं विधान भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केलं आहे.
माध्यमांशी संवाद साधताना साक्षी महाराज म्हणाले की, ज्या पक्षाच्या प्रमुखांनी कारसेवकांवर गोळीबार केला होता. तेथे आज रामचे भव्य मंदिर बांधले जात आहे. त्यामुळे अशा लोकांना हे पचत नाही. राम मंदिर ट्रस्टचे चंपत राय यांनी आपले संपूर्ण जीवन भगवान रामसाठी समर्पित केले आहे, असा दावा देखील त्यांनी केला आहे. म्हणून, अशा व्यक्तीवर आरोप करणे पूर्णपणे निराधार आहे.
जर आपण देणग्यांबद्दल बोलत असला तर आपण हिशोब घेऊ शकता किंवा पावती दाखवून देणगी परत घेऊ शकता, असे अवाहन साक्षी महाराज यांनी खासदार संजय सिंह आणि अखिलेश यादव यांना केले आहे. हे तेच लोक आहेत ज्यांनी राम मंदिराला कठोर विरोध केला होता, असं साक्षी महाराज म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








