●केलेल्या कामाची झाले सार्थक
●भाजी विक्री करणारे तीन भाऊ गेले होते
●प्रभू रामासाठी 800 कारसेवकांचा होता त्यावेळी सहभाग
प्रतिनिधी/सातारा
मरावे परी किर्तीरूपी उरावे या उक्तीप्रमाणे धर्मासाठी जगणारे सातारा शहर आणि परिसरात कार्यकर्ते कार्यरत आहेत. अयोध्यात 1992 मध्ये बाबरी मशीद प्रकरण चांगले गाजले होते. तो कार्यक्रम करण्यासाठी त्यावेळी साताऱ्यातून 800 कारसेवक गेले होते. वादग्रस्त वास्तू हटवण्यासाठी पुढच्या फळीत होते. उद्या प्रभू श्रीराम मंदिराचे भूमिपूजन अभूतपूर्व होत आहे. त्या सोहळ्याला कोरोनामुळे जाता येत नसले तरी सातारा येथील कारसेवकांना त्या दिवसाच्या आठवणीने अंगावर रोमांच उभे राहिले. मात्र, हा सोहळा होत असल्याने स्फुरण चढले आहे. सख्खे तीन भाऊ त्यावेळी गेलेले तिघे ही भाजी विक्री करणारे आहेत.
1990 साली अयोध्याच्या प्रकरण सुरू झाले. 1992 च्या डिसेंबरमध्ये 6 डिसेंबरला वादग्रस्त वास्तू हटवायला जाण्यासाठी त्यावेळी बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्याच्या साताऱ्यात बैठका झाल्या होत्या.सातारा शहरातील व परिसरातील त्यावेळी 800 कारसेवक दि.2डिसेंबर 1992 ला निजामुद्दीन एक्स्प्रेसने अयोध्येकडे रवाना झाले होते. तेथे गेल्यानंतर मिळालेल्या सूचनेनुसार साताऱ्याच्या कार सेवकांचा सहभाग बलिदान गटात पुढे होता. दि.6डिसेंबर 1992 ला पहाटेच सातारचे कार सेवक त्या वादग्रस्त वास्तूजवळ होते. जय श्रीरामच्या घोषणा देत सुरक्षा कडे तोडून त्या वास्तूत श्रीरामाचे दर्शन घेऊन बारावाजता इमारत पडायला सुरुवात केली. सायंकाळी 5 वाजता उध्वस्त करून सर्व कार सेवकांनी छोटं मंदिर स्थापन करून आरती केली. त्यात सहभागी झाले होते.
मोहिमेवरून आल्यानंतर त्यांचे स्वागत साताऱ्यात करण्यात आले.यामध्ये कार सेवक म्हणून मुकुंद पंडित, जितेंद्र महाडिक, संतोष प्रभुणे, अविनाश कोल्हापूरे, रघुनाथ सूर्यवंशी, विजय तिताडे, सोमनाथ तिताडे, नंदू तिताडे महेश तिताडे, अतुल शलगर, नाना शालगर, बाबूजी नाटेकर, शिरीष दिवाकर, बबलू परदेशी, विठ्ठल बलशेठवार असे कार सेवक सहभागी झाले होते. त्यामध्ये तीन भाजी विक्री करणारे तिघे भाऊ ही सहभागी झाले होते. सातारा येथे आल्यानंतर त्यांचे स्वागत केले.
आम्हाला अभिमान आहे
महान कार्य घडल्याचा आम्हाला अभिमान आहे.साडे तीनशे वर्षाचा कलंक आमच्याकडून पुसला गेला.याचा अभिमान आज 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पायाभरणी करत आहेत.त्यामुळे ते दिवस आठवल्याने अंगावर शहारे येत हेत.मोदींजींच्या पायाभरणी करत असले तरी प्रत्येक रामभक्त पायाभरणी करत आहे.आज लॉक डाऊन नसता तर अयोध्येत असतो. – सोमनाथ तिताडे
धन्य झालो आम्ही
कार सेवक म्हणून त्यावेळी 1992 ला अयोध्या येथे गेल्याचा अनुभव आजही ताजाच डोळ्यासमोर आहे.असे वाटते.देवाच कार्य आमच्या हातून घडलं यात आम्ही धन्य झालो.आज मोदीजी राम मंदिराची पायाभरणी करत आहेत हे पाहून कार्य सार्थकी लागल्याचे वाटते. – विठ्ठल बलशेठवार कार सेवक








