प्रतिनिधी /बेळगाव
श्रीराम कॉलनी आदर्शनगर रहिवासी संघटनेच्यावतीने संघटनेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. वृक्षसंवर्धनाबरोबर वृक्षांची संख्या वाढविण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला. व्यासपीठावर अध्यक्ष प्रदीप जोशी, उपाध्यक्ष विलास घाडी, सचिव प्रदीप चव्हाण उपस्थित होते.
यावेळी जयवंत खन्नुकर, सुनील हावळ, गोपाळ मिरजकर आदी मान्यवरांच्या हस्ते पूजन करून वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. गोपाळ मिरजकर यांनी ओळख करून दिली. शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी योगगुरु डॉ. मृगेंद्र पट्टणशेट्टी, डॉ. विनायक जोगळेकर, डॉ. प्रदीप चौधरी, सेवानिवृत्त शिक्षक जयवंत खन्नुकर आदींनी मनोगत व्यक्त केले.
सचिव प्रदीप चव्हाण यांनी संघटनेच्या कामाचा आढावा घेतला. याप्रसंगी शंकर चौगले, उमेश वाळवेकर, उमाकांत कामुले, कुलदीप भेकणे, रमेश धोतरे, राजेश पट्टणशेट्टी, शशिकांत शिंगण्णावर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बाबुराव घोरपडे यांनी केले. जयवंत खन्नुकर यांनी आभार मानले.









