ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राम मंदिर उभारणीसाठी स्थापन केलेल्या ट्रस्टच्या सदस्य आणि अध्यक्षपदावरून भाजपमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आता भाजप नेत्या आणि माजी केंद्रीयमंत्री उमा भारती यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
त्या म्हणाल्या, राम मंदिर ट्रस्टमध्ये दलित समाजातील एका व्यक्तीला स्थान देण्यात आले आहे. त्याप्रमाणे ओबीसी समाजातील एका व्यक्तीचा समावेश या ट्रस्टमध्ये केला पाहीजे. ओबीसी समाजातील व्यक्तीला ट्रस्टमध्ये न घेणे चूकीचे आहे.
रामजन्मभूमी आंदोलनाचे नेतृत्व कल्याणसिंह, विनय कटियार सारख्या नेत्यांनी केले आहे. परंतु, सरकारने राजकीय व्यक्तीला ट्रस्टमध्ये घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरी राजकारणाबाहेरील एखाद्या ओबीसी व्यक्तीला ट्रस्टमध्ये स्थान द्यायला हवे होते, असंही त्या म्हणाल्या.









