पोलीस वनविभागाची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
येथील पोलीस वनविभागाच्या अधिकाऱयांनी रामदुर्ग येथे बेकायदा सागवान जप्त केले आहे. शनिवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
पोलीस वनविभागाच्या पोलीस उपनिरीक्षक रोहिणी पाटील, हवालदार आर. बी. यरनाळ, सी. के. हिरेमठ, एस. अरबेंची, बाळाप्पा इंगळी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली असून सागवानच्या 20 नाटा जप्त करण्यात आल्या आहेत.
अब्दुलमुनाफ ढोलवाले (रा. रामदुर्ग) याला अटक करण्यात आली आहे. वनविभागाकडून कोणतीही परवानगी न घेता सागवान बाळगण्यात आले होते. यासंबंधी माहिती मिळताच पोलीस वनविभागाच्या अधिकाऱयांनी अचानक छापा टाकून अब्दुलमुनाफला अटक केली आहे. जप्त सागवानची किंमत 60 हजारांहून अधिक होते.









