क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
रामचंद्र मन्नोळकर पुरस्कृत आर. एम. स्पोर्ट्स क्लब हिंडलगा आयोजित मंगळवार दि. 26 जानेवारी पासून ग्रामीण भागातील क्रिकेट संघांसाठी मर्यादित 8 षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख रूपये 51 हजार व उपविजेत्या संघाला रोख रूपये पंचवीस हजार रूपये आणि रामचंद्र मन्नोळकर चषक देण्यात येईल. याशिवाय मालिकावीर, सर्वोत्कृष्ठ फलंदाज, सर्वोत्कृष्ठ गोलंदाज, सर्वोत्कृष्ठ झेल आणि या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यातील सामनावीर पुरस्कार याशिवाय इतर आकर्षक बक्षिसे देण्यात येतील. इच्छुक संघांनी अधिक माहितीसाठी विनय कुलकर्णी, प्रशांत काकतकर किंवा युवराज आगसगेकर यांच्याशी संपर्क साधून नावे नोंदवावी.









