वृत्तसंस्था/ पॅरिस
पेंच ओपन ग्रँडस्लॅमच्या पात्रता स्पर्धेत भारताच्या रामनाथन रामकुमारने पुरुष एकेरीची दुसरी फेरी गाठली. मात्र प्रज्नेश गुणेश्वरनचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
रामकुमारने एका सेटची पिछाडी भरून काढत अमेरिकेच्या मायकेल मिमोहवर 2-6, 7-6 (7-4), 6-3 अशी मात केली. सुमारे दोन तास ही लढत रंगली होती. त्याची पुढील लढत उझ्बेकच्या डेनिस इस्टोमिनशी होणार आहे. इस्टोमिननेही बोस्नियाच्या दामिर झुमुरवर तीन सेट्समध्ये विजय मिळविला. 32 व्या मानांकित प्रज्नेश गुणेश्वरनला मात्र जर्मनीच्या ऑस्कर ओटेकडून 6-2, 6-2 असा पराभव स्वीकारावा लागला.









