ऑनलाईन टीम / पॅरिस :
फ्रान्समधील राफेल लढाऊ विमाने तयार करणाऱ्या कंपनीचे मालक ओलिवियर दसॉल्ट (वय 69) यांचे रविवारी रात्री हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. दसॉल्ट हे फ्रान्सच्या संसदेचेही सदस्य होते.
दसॉल्ट रविवारी सुट्टीनिमित्त आपल्या खासगी हेलिकॉप्टरने फिरण्यासाठी गेले होते. सायंकाळी सहा वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री साडेदहाच्या सुमारास) त्यांचे हेलिकॉप्टर नॉर्मंडी परिसराजवळ अपघातग्रस्त झाले. या अपघातात दसॉल्ट यांचा जागीच मृत्यू झाला.
दसॉल्ट यांची कंपनी जगप्रसिद्ध राफेल लढाऊ विमाने तयार करते. एक उद्योजक, स्थानिक लोकनियुक्त अधिकारी आणि वायुसेनेचे कमांडर म्हणून त्यांनी फ्रान्सची सेवा केली.









