ऑनलाईन टीम / अंबाला :
भारत आणि चीन सीमेवर तणावाचे वातावरण असताना आज पाच राफेल लढाऊ विमानांचा भारतीय हवाई दलात औपचारिकरित्या समावेश झाला.

वायू दलात समावेश करण्यापूर्वी राफेल विमानांचे सर्वधर्मीयांकडून पूजन करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत आणि वायुसेनेचे एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांच्या उपस्थितीत राफेल विमाने भारतीय वायू दलात दाखल झाली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांच्या उपस्थितीत अंबाला एअरबेस येथे राफेल विमानांचा राज्याभिषेक सोहळा झाला. पारंपरिक पद्धतीने ‘सर्वधर्म पूजन’ करण्यात आले. मुस्लीम, शीख आणि ख्रिस्ती धर्मगुरुंनी प्रार्थना केली. यानंतर सुखोई 30 आणि जॅग्वार विमानांसोबत राफेलची चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.









