ऑनलाईन टीम / पॅरिस :
फ्रान्सच्या राफेल लढाऊ विमानांनी 12 तासात 17 हजार किमी अंतर कापून नवा विक्रम नोंदवला आहे. फ्रान्स हवाई दलाच्या एअर टू एअर रिफ्युलिंग ऑपरेटर मेजर पियरिक यांनी यासंदर्भात माहिती दिली.
पियरिक म्हणाल्या, पॅसिफिक महासागर भागात फ्रान्सने ताहिती येथे हवाई तळ उभारला आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी 3 राफेल विमानांसह अन्य 7 विमानांनी उड्डाण केले होते. पहिल्या उड्डाणात त्यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील एअरबेस गाठले. त्यानंतर कॅलिफोर्निया येथून थेट दक्षिण पॅसिफिक महासागरातील ताहिती हवाई तळ गाठले. या प्रवासादरम्यान राफेल विमानांमध्ये हवेतच 7 वेळा इंधन भरण्यात आले.









