प्रतिनिधी/ रत्नागिरी
लांजा तालुक्यातील खेरवसे येथे रानडुक्कराची शिकार केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघा संशयितांची वनविभागाने कसून चौकशी केल़ी यामध्ये आरोपींनी गुह्याची कबुली दिल़ी संशयितांनी यापूर्वी देखील अशा प्रकारे शिकार केली आहे का यासंबधीचा तपास वनविभागाकडून करण्यात येत आह़े
विशाल उद्धव चव्हाण (30), विनोद केशव जाधव (47) व सुनिल अनंत शिंदे (40, सर्व ऱा खेरवसे त़ा लांजा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़ वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार खेरवसे येथील रहिवासी प्रकाश नारायण सकपाळ यांच्या आंबा बागेत शॉक देवून रानडुक्कराची शिकार करण्यात आली होत़ी
या घटनेची खबर खेरवसे येथील नेवाजी भिमराव पोटे यांनी वनविभागाकडे दिली होत़ी या नंतर वनविभागाने छापा टाकून 3 संशयितांना रंगे हाथ पकडले होत़े त्याच्याकडून मृत रानडुक्कराचे मांस, 4 लोखंडी सुरी, कोयता, चार्जिंग बॅटरी, ऍल्युमिनिअम वायर आदी साहित्य जप्त करण्यात आल़े सदरची कारवाई विभागिय वनअधिकारी रमाकांत भवर यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनअधिकारी प्रियंका लगड, ग़ौ पि कांबळे, सागर पताडे, म़ ग पाटील, विक्रम कुंभार यांनी कारवाई केली होत़ी









