सलमान खानची ईद भेट
‘मोस्ट वॉण्टेड भाई’च्या महाप्रदर्शनाची योजना जाहीर केली आहे. प्रभू देवाने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट अनेकविध प्लॅटफॉर्म्सवरून प्रदर्शित केला जाणार आहे, 13 मे 2021 रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटगृहांतून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सलमान खानचे चित्रपट म्हणजे निर्भेळ मनोरंजन असते आणि सर्व स्तरांतील प्रेक्षकांना हे चित्रपट आकर्षित करतात. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या सोयीसुविधेनुसार हा चित्रपट बघण्याचे अनेकविध पर्याय मिळणार आहेत. सलमान खानसोबत या चित्रपटात दिशा पटानी, रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफ प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. या चित्रपटाचे सादरीकरण सलमान खान फिल्म्सने झी स्टुडिओजच्या सहयोगाने केले आहे.
निर्मिती सलमान खान, सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांनी केली आहे. हा चित्रपट 13 मे 2021 रोजी ईदचे औचित्य साधून प्रदर्शित केला जाणार आहे.
कोविड नियमांनुसार भारतीय राज्यांमध्ये चित्रपटगृहे खुली आहेत त्या राज्यांमध्ये चित्रपट प्रदर्शन चित्रपटगृहांद्वारे केले जाणार आहे. आखाती देश, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर, युरोप आदी भागातील 40 देशांमध्ये या चित्रपटाचे विस्तृत आंतरराष्ट्रीय प्रदर्शन करण्याची योजना आखली जात आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊननंतर
यूकेमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरणार आहे. हा चित्रपट झीप्लेक्स पे पर ह्यू सेवेद्वारेही बघितला जाऊ शकेल. झीप्लेक्स सेवा डिश, डीटूएच,
टाटा स्काय आणि एअरटेल डिजिटल टीव्ही या डीटीएच प्लॅटफॉर्म्सवरही उपलब्ध आहे.









