राधानगरी/प्रतिनिधी
जागतिक वारसा स्थळात समावेश असलेल्या राधानगरी अभयारण्यात श्रावणबाळ विकलांग वसतिगृह नांदनी ता, शिरोळ येथील 17 विद्यार्थ्यांनी वन्यजीव विभागाने पर्यटना चालना मिळण्या साठी दिव्यांग व विकलांग विध्यार्थ्यांना मोफत बससेवा उपलब्ध करून दिली ,या उद्देशाने या विद्यार्थ्यांनी हत्तीमहाल, फुलपाखरू उद्यान, राऊतवाडी धबधबा, माळेवाडी धरण, राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे , दाजीपूर निसर्ग माहिती केंद्र यांना भेट देऊन पर्यटनाचा आनंद लुटला व मुले वनपर्यटनातून प्रफुल्लित झाली.
तसेच या विद्यार्थ्यांना काकासाहेब आठवले वसतिगृह कसबा तारळे या संस्थेने अल्पोपहार व दुपारच्या जेवणाची सोय केली, व श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना, पनोरी व मराठा महासंघ राधानगरी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन, या शैक्षणिक साहित्य सह साखर, तेल, डाळी, किराणा माल आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी पणन संघाचे संचालक, नंदकिशोर सुर्यवंशी, सुहास निंबाळकर, वनक्षेत्रपाल अजित माळी, सूर्यकांत गुरव, दत्तात्रय केसरे, विलास डवर, राम कदम, अरुण आडके, महेश तिरवडे, बंडोपंत नाटेकर यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष सतिश जांगटे, रुपाली निशानदार, दीपक पाटील उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









