प्रतिनिधी/राधानगरी
२६ जून शाहू जयंतीदिनी राजर्षी शाहू महाराजांची जयंती राधानगरी धरणस्थळी साजरी करण्यात आली. याप्रकरणी प्रतिबंधात्मक क्षेत्रात विनापरवाना प्रवेश करून कोविड नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी राधानगरी येथील भाजपचे तालुकाध्यक्ष संभाजी आरडे यांच्यासह पंधरा लोकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जिल्ह्यात कोरोना संचारबंदी असताना मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे असे नियम असताना लक्ष्मी तलाव येथे कलश पूजन पाणी पूजन करून गर्दी जमवल्याप्रकरणी भाजपचे तालुकाध्यक्ष संभाजी आरडे, दीपक मगर, लहू जरग, बाळासाहेब पाटील, भैय्या इंगळे, दीपक शिरगावकर, युवराज पाटील, विशाल पाटील, सुभाष जाधव ,संतोष कातीवले, महेश पाटील, सुनील पाटील, भूषण पाटील यांच्यासह शंभर ते दीडशे अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पाटबंधारे विभागाचे सुभाष गोविंद पाटील यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बजरंग पाटील व राधानगरी पोलीस करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









