कृती समितीची मागणी
प्रतिनिधी / राधानगरी
राधानगरी धरणामध्ये गतवर्षी ७ जुन रोजी २० टक्के पाणी साठा शिल्लक होता. तर आज ३१ टक्के म्हणजेचं गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ११ टक्के अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाच्या विसर्गाचं असंच नियोजन राहिलं तर भविष्यात कोल्हापूर जिल्ह्याला पूरस्थितीस सामोरं जायला लागणार आहे. धरणात ३० टक्केहून कमी साठा झाल्यानंतर सध्या वीजनिर्मिती करणारे खासगी वीजनिर्मिती केंद्राची वीज निर्मिती बंद होते. वीजनिर्मिती शिवाय पाणी विसर्ग करावा लागत असल्याने संथ गतीने विसर्ग केला जातोय त्यामुळे धरणाच्या मृत साठ्यापर्यंत वीज निर्मिती करणारं जुने शासकीय वीज निर्मिती केंद्र सुरू करण्याची मागणी जुने वीज निर्मिती केंद्र बचाओ कृती समितीकडून होत आहे.
३६ टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या राधानगरी धरणात आज २ .५९ टीएमसी ३१ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. गतवर्षी याच दिवशी धरणामध्ये १.७१ टीएमसी २० टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक होता. यावर्षी ज्यादा पाणी साठा शिल्लक असल्याने भविष्यात कोल्हापूर जिल्ह्याला पुरस्थितिशी सामोरं जाण्याचे संकेत मिळत आहेत. खाजगी बीओटी तत्वावर सुरू असणारे वीजनिर्मिती केंद्र धरणामध्ये ३०टक्केपेक्षा कमी पाणीसाठा झालेनंतर वीजनिर्मिती करू शकत नाही त्यामुळे धरणामध्ये ३०टक्के पाणी साठा शिल्लक ठेऊन विसर्ग केला जातो. धरण पूर्ण भरल्यानंतर स्वयंचलित दरवाजे सुरू होता रिडल गेटची व्यवस्था नसल्याने धरणातून होणारा विसर्ग आणि अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होते. हे टाळण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी सुरु केलेले जुने वीजनिर्मिती केंद्र दुरुस्त करून पाणी सोडल्यास वीज निर्मिती होऊन कोट्यावधी रुपयांचा शासनाचा फायदा होऊ शकतो. याबरोबर गंभीर पूरपरिस्थितीही उद्भवणार नाही अशी मागणी पॉवर हाऊस बचाव कृती समितीचे अध्यक्ष नंदकिशोर बापूसाहेब सूर्यवंशी, सुहास निंबाळकर, दीपक शेट्टी, राजेंद्र चव्हाण, प्रा पी एस पाटील आदींनी केली आहे.
मार्च 2011 पासून हे जलविद्युत केंद्र पाण्या अभावी बंद करण्यात आले, वेळोवेळी जलसंपदा विभाग व शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून आंदोलन ही करण्यात आले मात्र शासन दरबारी कोणत्याही प्रकारचा आजतागायत निर्णय झाला नाही, या ही वर्षी जलविद्युत केंद्रास पाणी न दिल्यास आंदोलन करण्यात येईल – नंदकिशोर सूर्यवंशी, अध्यक्ष, कृती समिती राधानगरी जलविद्युत केंद्र
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









