प्रतिनिधी / राधानगरी
राधानगरी धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसा पासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामूळे या पावसामूळे धरणाच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. यामुळे आज दि. 8 सप्टेंबर रोजी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले गेले आहेत.
दुपारी 3.27 वाजता स्वयंचलित असणारा 6 क्रमांकाचा दरवाजा उघडला आहे. त्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली असून ती 347.47 फूट झाली आहे. तसेच 4256 क्युसेकने विसर्ग सुरू झाला आहे.