धामोड / वार्ताहर
राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागातील तुळशी खोऱ्यातील केळोशी बु॥ येथील लघुपाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने आज भरला . प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने उर्वरीत पाण्याचा प्रवाह उजव्या तीरावरील कालव्यातून थेट तुळशी जलाशयात सुरू झाला आहे . त्यामुळे ५० टक्के भरलेल्या तुळशी जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे .एवढया लवकर ‘ ओव्हर फ्लो ‘ होणारा राधानगरी तालुक्यातील खामकरवाडीनंतर केळोशी हा दुसरा प्रकल्प म्हणावा लागेल .
केळोशी बु॥ येथील बैलगोंड नावाच्या लोंढानाल्यावर ५६०३ .२२५ सहस्त्र घनमीटर पाणी साठवण क्षमतेचा लघुपाटबंधारे प्रकल्प सन २००६ साली बांधण्यात आला आहे . या प्रकल्पामुळे केळोशी बु॥, कुंभारवाडी , सुतारवाडी , पिलावरेवाडी , देऊळवाडी , जाधववाडी , वळवंटवाडी ,खामकरवाडी , अवचितवाडी, कुरणेवाडी कोते, चांदे आदी गावांना कमी – अधिक प्रमाणात शेतीसाठी फायदा झाला आहे .ऐन उन्हाळ्यात जानेवारी -फेब्रुवारी पासूनच हा प्रकल्प रिकामा होतो त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते . गेल्या तीन -चार दिवसापासून परिसरात पावसाची जोरदार हजेरी सुरु असून गेल्या २४ तासात ५७ मिमी तर आज अखेर ११६९ मी . मी पावसाची नोंद प्रकल्प क्षेत्रात झाली आहे . प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने उर्वरित पाणी उजव्या तीरावरील सांडव्यावरुन थेट तुळशी जलाशयात वाहत आहे . त्यामुळे तुळशी जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ होत असून धरणाची पाणी पातळी ६०६ .०८ मीटर इतकी झाली आहे . सध्या तुळशी जलाशय ५० टक्के इतके भरले असून केळोशी प्रकल्पाच्या पाण्यामुळे यात दिवसेदिवस वाढ होत आहे .केळोशी प्रकल्प गतसाली १९ जुलैला भरला होता तर चालू वर्षी १४ जुलैला भरला आहे . अंतर्गत उगाळ तसेच पाऊस समाधानकारक झाल्यास केळोशी लघुप्रकल्पामुळे तुळशी जलाशयाच्या पाणीसाठ्यात वाढ होईल असे शाखा अभियंता विजयराव आंबोळे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









