राधानगरी/प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यातील एका गावच्या लोकनियुक्त सरपंच महिलेच्या कोरोना ग्रस्त पतीचे आज सकाळी कोल्हापुरातील खाजगी इस्पितळात निधन झाले. ४२ वर्षे वयाचा हा उमदा तरुण कार्यकर्ता ग्रामपंचायतीचे कामकाज पहात असल्याने गावातील ६० हून अधिक लोक त्याच्या थेट संपर्कात आल्याचे समजते.