राधानगरी / प्रतिनिधी
राधानगरी ग्रामपंचायतीला नगरपंचायत करण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे नूतन संचालक अभिजित तायशेटे यांनी ग्रामपंचायत राधानगरीमध्ये आयोजीत सत्कार समारंभात केले.
आज राधानगरी येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी यांच्यावतीने गोकुळ दूध संघाच्या संचालकपदी निवड झालेबद्दल व कोव्हिड काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी सत्काराला उत्तर देताना अभिजित तायशेटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी ते म्हणाले राधानगरी हे तालुका स्थळ तसेच नावारूपाला येणारे पर्यटन स्थळ असून पण येथे बऱ्याच गोष्टींना ग्रामपंचायतमुळे निधीची कमतरता असते त्यामुळे विकासकामांना मर्यादा येतात तरी राधानगरीत सर्वपक्षीय प्रमुख नेते,कार्यकर्ते व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन,पालकमंत्री,खासदार, आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत ला नगरपंचायत करून आरोग्य,शिक्षण व भौतिक सुविधांसाठी विशेष निधी आणण्याचा प्रयत्न राहणार आहे.
यावेळी ग्रामपंचायत चे पदाधिकारी व आरोग्य अधिकारी यांच्या सोबत लसीकरण मोहिमेचा आढावा घेऊन जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरण करून घेण्याचा सूचना दिल्या. यावेळी त्यांच्या हस्ते आरोग्य सेवक शरद पवार व आरोग्य सेविका
गुसरकार, चौगुले वयांचा सत्कार विशेष सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला सरपंच कविता शेट्टी व दीपक शेट्टी, सचिन पालकर,प्रकाश बालनकर,भाऊ टिपूगडे,युवराज पाटील,मारुती टिपूगडे,मंगेश चौगले,अनिल बडदारे,तानाजी कुंभार,राजू ढाले, महिपती कांबळे उपस्थित होते. स्वागत व प्रस्ताविक उमेश शिंदे यांनी तर आभार ग्रामसेवक महादेव गुरव यांनी मानले.