आवळी बुद्रुक / वार्ताहर
गेले पाच दिवस जोरदार पाऊस पडत असल्याने राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुले झाले आहेत. यामुळे भोगावती नदीपात्रात पाणी पातळी वाढली आहे. पावसाळा संपला असला तरी परतीच्या पावसाने जोर धरला आहे. मात्र या पावसाला समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाने ऊग्र रूप धारण केले आहे.
गेले पाच दिवस जोरदार पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके पावसामूळे वाया जात आहेत. राधानगरी धरण परिसरात ७०मि.मी.पाऊस पडलेला आहे. सतत पाऊस पडत असल्याने धरणाची पातळी ३४७. ५१ एवढी झाली असून पूर्णपणे भरून ओसंडत आहे. दुपारी १२.३८ वाजता क्र. ६ नं.चा व १२.४८ वाजता क्र. ३ नंबरचा स्वयंचलीत दरवाजे खुले झाले आहेत. असाच पाऊस पडत राहीला तर आणखीन दरवाजे पडण्याची शक्यता आहे.
यावर्षी आजपर्यंत ४५८२ मि.मी. पाऊस पडलेला असून गतवर्षी यादिवशी ६६८५ मि.मी. पडलेला होता. तर आज ७० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे. स्वंयचलीत दोन दरवाजातून २८५६ क्यूसेस व बि.ओ.टी. पॉवर हाऊस मधून १४०० क्युसेक असे एकूण ४२५६ क्युसेक धरणातून विसर्ग चालू असल्याने भोगावती नदीमध्ये पाणीपातळी वाढली आहे. असाच पाऊस पडत राहिला तर नदीपात्राबाहेर पाणी पडण्याची शक्यता आहे. तर दुधगंगा धरण शंभर टक्के भरलेले असून पाणी पातळी ६४६.१५ इतकी असून या धरणातून १९५९ क्युसेस पाण्याचा विसर्ग चालू आहे. तर धरणक्षेत्रात १४ मिमी पाऊस पडला आहे. तर आजपर्यंत ३६९१ मिमी पाऊस पडलेला आहे. धरणामध्ये जेवढे पाणी जमा होईल तेवढे पाणी दुधगंगा नदीमध्ये सोडण्यात येत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









