दोडामार्ग / वार्ताहर:
राज्यातील निष्क्रिय सत्ताधाऱ्यांमुळे दोडामार्ग तालुक्याचा विकास खुंटला असून केंद्रीय मंत्री पदाच्या रूपाने नारायण राणे यांच्या माध्यमातून जिल्ह्याला पर्यायाने दोडामार्गला खंबीर नेतृत्व मिळाले आहे. त्याचा सर्वोतोपरी फायदा सर्वांना निश्चित होईल असे भाजपचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रवीण गवस यांनी सांगितले. नाम. राणें यांची जनआशीर्वाद यात्रा दोडामार्गात उद्या रविवारी येत असल्याचा पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
दुपारी 2.30 वाजण्याच्या दरम्यान नारायण राणे यांचे आडाळी एमआयडीसी येथे आगमन होणार आहे. तेथे पाहणी तसेच स्थानिकांची चर्चा विनिमय व स्वागत स्वीकारून ते दोडामार्ग दिशेने रवाना होणार आहेत. पिंपळेश्वर देवस्थानचे दर्शन व आशीर्वाद घेतल्यानंतर गांधी चौकात त्यांचे भव्य स्वागत केले जाणार आहे. श्री. राणें यांचे ढोल पथक व फटाक्यांच्या अतिषबाजीत स्वागत केले जाणार असून स्थानिक मराठा समाज, कुंभार समाज, एनआरएचएम, ओबीसी समाज, आदींच्यावतीने निवेदन देण्यात येणार आहेत असे श्री गवस यांनी सांगितले. दोडामार्ग तालुक्याची निर्मिती होऊन आज बरीच वर्षे झाली. तरी केवळ नाम. राणें मुळेच हा तालुका झाला हे कुणीही विसरू शकत नाही. आपल्या मंत्री पदांच्या कारकिर्दीत श्री. राणें यांनी दोडामार्ग तालुक्याकडे विशेष लक्ष दिले होते. मात्र अलीकडच्या काळात विद्यमान निष्क्रिय सत्ताधाऱ्यांनी तालुका विकासाच्या केवळ घोषणाच केल्या. मिळालेल्या जनाधाराचा त्यांनी दुरुउपयोगच केला आहे. आता श्री. राणें यांना मिळालेल्या केंद्रीय मंत्रीपदाच्या माध्यमातून पुन्हा एकदा विकासाची संधी प्राप्त झाली आहे असे श्री गवस यांनी शेवटी स्पष्ट केले. दरम्यान उद्याच्या जनआशीर्वाद यात्रेला दोडामार्ग तालुक्यातील पदाधिकारी – कार्येकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. गवस यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









