मुंबई / ऑनलाईन टीम
मागच्या काही दिवसांपासून देशासह राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या रुग्णवाढीमुळे शासन आणि प्रशासन चिंतेत आहे. यामुळे राज्यात होणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या आणि नोकरभरतीच्या परीक्षांबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला, अशी मागणी केली आहे. दरम्यान ११ एप्रिल रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाक़डून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा पार पडणार आहे. त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज ठाकरे यांच्यासोबतच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच खासदार नवनीत राणा यांनी देखील एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
Previous Articleराज्यातील आठ शहरात उद्यापासून नाईट कर्फ्यू
Next Article अंसार गजवा-तुल-हिंदच्या मुख्य कमांडरचा खात्मा








