ऑनलाईन टीम / मुंबई :
मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यास राज्य सरकार वचनबद्ध आहे. त्यामुळे मराठा बांधवांनी मोर्चे काढू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले, मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात तात्पुरती स्थगिती मिळाली. त्यानंतर राज्यातील मराठा संघटना आक्रमक झाल्या असून, संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. राज्य सरकार मराठा समाजाच्या न्याय आणि हक्कांसाठी कटिबद्ध आहे.
मराठा समाजाची बाजू सरकार आक्रमकपणे मांडत आहे. जेष्ठ विधीज्ञांसोबत चर्चाही सुरू आहे. त्यामुळे सरकार बरोबर असताना मराठा समाजाने आंदोलने करू नये. मराठा समाजाला लवकरच न्याय मिळेल, असेही ठाकरे म्हणाले.