मुंबई \ ऑनलाओईन टीम
राज्यातील १८ जिल्ह्यांतील सर्व निर्बंध हटविण्यात आल्याची घोषणा काल , गुरूवारी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली होती. यानंतर काही वेळेतच असा कोणताही निर्णयच झाला नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले. या गोंधळानंतर मात्र विरोधकांकडून राज्य सरकारमध्ये विसंवाद असल्याची टीका होऊ लागली. या सगळ्य प्रकरणावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच जर काही विसंवाद असेल तर काँग्रेसचे मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितले.
माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये कशल्याही प्रकारचा विसंवाद नाही. विजय वडेट्टीवार यांनी गोंधळानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वडेट्टीवार हे गत्यंतर ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांना राज्यकरभाराचा अनुभव आहे. पण काही विषयांवर संभ्रम असून मुख्यमंत्र्यांना भेटून तो दूर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की, सर्वांनी एकत्र मिळून काम करावं लागेल. समन्वय वाढवावा लागेल. मुख्यमंत्री कोरोना काळात चांगलं काम करत आहेत. कोरोना संकटावर नियंत्रण मिळविण्यात आपल्याला यश आल्याचे देखील बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले.
Previous Articleदुसऱ्या लाटेसाठी ‘डेल्टा’ व्हेरिएंट जबाबदार
Next Article सावंतवाडीत विजेचा धक्का बसून युवकाचे निधन








