शरद पवारांनी केंद्र सरकारकडे बोट दाखवण्यापेक्षा राज्य सरकारला निर्देश द्यावे
मुंबई/प्रतिनिधी
दरम्यान, महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलेलं आहे. आरक्षणावरून राज्य सरकार भाजपकडे तर भाजपचे नेते ठाकरे सरकारकडे बोट दाखवत आहेत. आरक्षणाच्या या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. शरद पवार यांनी इम्पेरीकल डाटा गोळा करण्यासाठी केंद्राकडे बोट न दाखविता निधी मिळवून द्यावा, राज्य सरकारची नाचता येईना अंगण वाकडं’ अशी सध्याची अवस्था आहे, अशी टीका करत, डिसेंबरपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालं नाही, तर महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. असा इशारा चंद्रशेखर बावनकुळेंचा महाविकास आघाडी सरकारला दिलाय.
दरम्यान ‘ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारने ताट वाढलंय, पण राज्य सरकारने ओबीसी समाजाचे हात बांधलेय, ओबीसी आरक्षणाचं केंद्र सरकारने समोर केलेलं ताट राज्य सरकार हिसकावून घेत आहेत, राज्य सरकार इम्पेरीकल डाटा गोळा करायला निधी आणि मनुष्यबळ देत नाही, शरद पवार यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखवण्यापेक्षा राज्य सरकारला याबाबत निर्देश द्यावे’ कालच्या शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर भाजप प्रदेश सरचीटणीस चंद्रशेखर बावनकुळेंनी चोख उत्तर देत, राज्य सरकारवर गंभीर आरोप केले.