प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य विधिमंडळाचे अधिवेशन 28 जानेवारीपासून ते 4 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 28 रोजी राज्यपाल वजुभाई वाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधून अभिभाषण करणार आहेत. राज्यपालांचे भाषणावर चर्चा आणि इतर मुद्दय़ांवरील चर्चेपुरतेच अधिवेशन मर्यादित राहणार आहे. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्यात येईल, अशी माहिती कायदा आणि संसदीय कामकाजमंत्री जे. सी. माधुस्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली.









