मराठा क्रांती मोर्चाची राज्यपालांकडे तक्रार, मागासवर्गीय आयोगातील सदस्यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी
प्रतिनिधी/मिरज
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने नऊ सदस्यांचे मागासवर्गीय आयोग स्थापन केले आहे. मात्र, या आयोगातील सदस्यांपैकी काहीजण गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, मराठा समाजा विरोधात द्वेषपूर्ण वक्तव्य केली जात आहेत. जातीयवादी दृष्टीकोनातून सदरचे आयोग काम करीत असल्याने आयोगातील जातीवादी सदस्यांची नियुक्त रद्द करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक विलास देसाई यांच्या नेतृत्वाखाली दिलीप पाटील, विरेंद्र पवार, गणेश काटकर, छायाताई इंदूलकर, प्रविण मिसाळ या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. राज्य मागासवर्गीय आयोगात एकूण नऊ सदस्य असून, त्यापैकी प्रा. लक्ष्मण हाके, प्राचार्य बबनराव तायवाडे, डॉ. गोविंद काळे, डॉ. नीलिमा सराफ हे सदस्य मराठा समाजाप्रति वारंवार द्वेषपूर्ण भाषणे करीत आहेत. आयोगाचे सदस्य निवडताना राजकीय नेते व कॉन्ट्रक्टर तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना प्राधान्य देण्यात आले आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









