तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रतिनिधी / सोलापूर
राज्य उत्पादन शुल्क पथकावर कारवाई दरम्यान प्राणघातक हल्ला केला असल्याची घटना घडली आहे. याबाबत मद्य तस्करांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित दोन्ही आरोपी तुळजापूर(उस्मानाबाद) पोलिसांच्या ताब्यात आहेत.
गुरुवारी दुपारी सोलापूर येथील राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने मोठी कारवाई करत गोवा निर्मित मोठा मद्यसाठा जप्त केला आहे. या कारवाई मध्ये 8 लाख 84 हजारांचा विदेशी दारूच्या 25 बॉक्स हस्तगत केल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना अशी माहिती मिळाली होती की, बाजूच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन मद्य माफियांचा यामध्ये मोठा सहभाग आहे. या भरारी पथकाने मंद्रुप कंदलगाव या मार्गावर पकडलेला माल जप्त करून मद्य माफिया रोहित खुने व मुन्ना खुने यांना अटक करण्यासाठी उस्मानाबादकडे मोर्चा वळविला. एका खबऱ्याने माहिती दिली की, दोन्ही मद्य माफिया तुळजापुरात लपून बसले आहेत.
राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने ताबडतोब आपला मोर्चा तुळजापूर येथे वळविला आणि कारवाई करण्याचा प्रयत्न केला. पण दबा धरून बसलेल्या या मद्य माफियांनी राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांवर चार चाकी वाहन चढविले. पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी आपले प्राण वाचवत जखमी झाले. पण दोघा मद्य माफियांना सिने स्टाईलरित्या पकडले. रोहित खुने व मुन्ना खुने हे दोघे सराईत मद्य तस्करी करणारे असल्याची फिर्याद तुळजापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. आणि त्याविरोधात सरकारी कामात अडथळा(भा. द. वि.353), प्राणघातक हल्ला(भा. द. वि.307) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघे मद्य तस्कर तुळजापूर पोलिसांच्या ताब्यात आहेत.
Previous Articleसोलापुरात आणखी एकाचा सावकारीने घेतला बळी
Next Article तासगाव तालुक्यात 19 गावात 29 कोरोना रुग्ण









