कोविड योद्धा सुरक्षा रक्षक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानीत
विषेध प्रतिनिधी/ पर्वरी
कोविड काळात सुरक्षा रक्षकांचे काम उल्लेखनीय असून त्यांना आणखी योग्य ते प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच पुढील वर्षी आणखी 2500 सुरक्षा रक्षकांची भरती केली जाणार आहे, असे यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
काल गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला गोवा राज्य मानव विकास महामंडळातर्फे पर्वरीतील राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदच्या सभागृहात या सुरक्षारक्षक कोरोना योद्धांचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर गोवा राज्य मानव संसाधन विकास महामडंळाचे व्यवस्थापकीय संचालक डेरिक नॅटोव, राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदचे संचालक नागराज होन्नीकरी, उपसंचालक केशव प्रभु सहव्यवस्थापक नारायण नावती उपस्थित होते.
कोविडच्या या महामारीत अनेक कोरोना योद्धांनी आपले कार्य व्यवस्थित रित्या पार पाडले आहे. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी पोलीस त्याच प्रमाणे आमचे सुरक्षा रक्षक जीवाची पर्वा न करता या काळात काम करत आहे. त्यामुळे त्यांचे योगदान मोठे आहे. गोवा राज्य मानव संसाधन विकास महामंडळातर्फे अनेक सुरक्षा रक्षक इस्पीतळात तसेच अनेक सरकारी कार्यालयात योग्य रित्या काम करत आहे. त्यांना आणखी चांगले प्रशिक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. या महामंडळातर्फे अनेक प्रशिक्षण संधी सुरु करणार त्यामुळे कमी शिकलेल्या सुरक्षा रक्षकांना याचा फायदा होणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
पुढील वर्षात सुरक्षा रक्षकांची भरती करणार
राज्यात अनेक सरकारी आस्थापने कार्यालये आहे. या महामंडळामध्ये समारा 2800 सुरक्षा रक्षक आहे. त्यामुळे यात सुरक्षारक्षकांची कमतरता भासत आहे. पुढील दिड वर्षात आणखी 2500 हजार सुरक्षा रक्षकांची भरती केली जाणार आहे. राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतून त्यांना योग्य ते प्रशिक्षण मिळत आहे. सरकारच्या अनेक आस्थापनामध्ये या सुरक्षा रक्षकांचे योगदान मोलाचे ठरत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
जीएचआरडीसी काम उल्लेखनीय
राज्य सरकारची अनेक महामंडळे आहे पण गोवा राज्य मानव संसाधन विकास महामडंळाचे काम उल्लेखनीय आहे. सरकारची काही महामंडळे ही तोटय़ात चालत आहे पण हे महामंडळ तोटय़ात नसून ते वेळेवर कामगारांना पगार देत आहे. या महामंडळातर्फे योग्य ते मार्गदर्शन कामगारांना मिळत आहे. सरकारचाही या महामंडळाला योग्य तो पाठींबा मिळत आहे. त्यामुळे आजच्या या कोरोनाच्या कठीण काळात या महाडळातर्फे सुरक्षा रक्षक कोरोना योद्धा होऊन राज्यातील जनतेची सेवा करत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.









