प्रतिनिधी/ पणजी :
पावसाळय़ात मासेमारीवरील बंदी फक्त दोन महिने राहणार आहे. 1 जून ते 31 जुलैपर्यंत एकूण 61 दिवस मासेमारीवर बंदी राहील, असे मच्छीमारी खात्याच्या संचालक डॉ. शार्मिला मोंतेरो यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. ट्रॉलर किंवा 10 एच. पी. क्षमतेपेक्षा जास्त शक्ती असलेल्या मोटर बसवलेल्या होडय़ा घेऊन मासेमारी करण्यास व खोल समुद्रात जाण्यास बंदी असेल. पर्ससीन जाळी, ट्रॉल नेटद्वारे मासेमारी करता येणार नाही, असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.









