बेंगळूर/प्रतिनिधी
राज्य सरकारने सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या अनुषंगाने पगार वाढवण्यास नकार दिल्याने परिवहन महामंडळाच्या १.२ लाख कर्मचार्यांनी बुधवारी कर्नाटकात सुमारे १,५ हजाराहून अधिक बसेस बंद ठेवत संप केला. अत्यावश्यक सेवा देखभाल अधिनियम (एस्मा) लागू करण्याची सरकारची धमकी देऊनही बीएमटीसी आणि केएसआरटीसीसह चार महामंडळांमधील कर्मचार्यांनी कामावर येण्यास नकार दिला. जो पर्यंत मागण्या मान्य केल्या जात नाहीत, तो पर्यंत राज्यात बेमुदत संप सुरु राहील असे म्हंटले आहे. दरम्यान मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन कामावर परतावे असे आवाहन केले आहे. तसेच कर्मचाऱ्यांनी चर्चेस यावे असेही म्हंटले आहे.
परिवहन कर्मचाऱ्यांचा हा संप राज्यभरात सुरु आहे. राज्यभरातील केएसआरटीसीच्या ५,५०० बसेसपैकी केवळ २६४ बसेस रस्त्यावर ढवळ्या. बेंगळूर शहरात बीएमटीसीला नेहमीच्या ५,६०० बसेसच्या तुलनेत सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या दरम्यान फक्त १४५ बस चालवता आल्या.









