प्रतिनिधी / सातारा
नियम म्हणजे नियम मग तेथे कोणीही असो, कोरोनामुळे कोणीही वाहन घेऊन बाहेर पडायचे नाही अशी सक्ती करण्यात आली होती. त्या जुलै महिन्यात पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार एका महिन्यात 48 हजार 762 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्यात सातारा जिल्हा या कारवाईत प्रथम क्रमांकावर आहे. कोविड- १९ च्या अनुषंगाने शासन आदेशानुसार लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरीता पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सातारा जिल्ह्यात जुलै महिन्यामध्ये अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, विभागीय पोलीस अधिकारी समीर शेख, जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक संदिप भागवत यांच्या मार्गदर्शना नुसार वाहतूक विशेष मोहिमेचे नियोजन करुन लॉकडाऊनच्या नियम मोडणारे बेशीस्त वाहन चालकांवर इ-चलन मशीनव्दारे मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.
या मोहिमेमध्ये एकुण ४८ हजार ७६२ कारवाई करण्यात आली. सातारा जिल्हा वाहतूक पोलीसांनी केलेली कारवाई ही महाराष्ट्र राज्यात सरासरी नुसार प्रथम क्रमांकाने अव्वल ठरली आहे. सहा.पोलीस निरीक्षक व्ही.ए.शेलार व वाहतूक नियंत्रण शाखा सातारा शहर कर्मचारी यांच्या मार्फत ही कारवाई करण्यात आली आहे.लॉकडाऊनचे नियंमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरीता व सुरक्षीत वाहतूकी करीता यापुढे देखील लॉकडाऊनचे व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात विशेष मोहिम राबवून आणखी तीव्र कारवाई करण्यात येणार असल्याने वाहनधारकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, आवाहन वाहतूक शाखेचे सहा.पो.निरीक्षक, व्ही. ए. शेलार यांनी केले आहे.
Previous Articleमहापुराबाबत महाराष्ट्र व कर्नाटक दोन्ही राज्यांमध्ये समन्वय
Next Article आंबेवाडीत भरदिवसा गोळीबार








