मुंबई / ऑनलाईन टीम
राज्यात सत्ताबदल होणार हे निश्चित असून तो कधी होणार हे अजित पवार यांना ठाऊक आहे, असे सूचक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. यासोबतच पंढरपूर-मंगळवेढ्याची निवडणूक भाजप जिंकणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंढपरपूरची पोटनिवडणूक महाविकासआघाडीच्या हातातून गेली आहे. त्यामुळे अजित पवार यांना राजकीयदृष्ट्या फारसे महत्त्व नसलेल्या लोकांच्या घरी जावे लागते. हा अजित पवारांचा स्वभाव नाही. हा स्वभाव शरद पवार यांचा आहे. हे निवडणूक त्यांच्या हातातून गेल्याचं लक्षण आहे. अजित पवार यांच्या पायाखालची जमीन सरकल्याचे दिसत आहे. आम्ही किंवा त्यांनी कोणीही अहंकार बाळगण्याची गरज नाही. त्यामुळे अजित पवार जास्त गमजा मारु नका. कालचक्र हे फिरत असतं. पंधरा वर्षे त्यांची सत्ता होती, ती जाऊन पाच वर्षे आमची सत्ता आली होती. आता पुन्हा त्यांची सत्ता आली आहे. त्यामुळे कुणीही अमरपट्टा घालून आलेले नाही.
महाविकासआघाडीचं सरकार कधी आणि कसं पडणार, हे अजित पवारांना नेमकेपणाने ठाऊक असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, अजित पवार यांना मला एक इशारा द्यायचा आहे. खूप दिवस मला ‘चंपा’ म्हणणं त्यांच्या लोकांनी थांबवलं होतं. कारण मी बोलायला लागलो तर महागात पडेन असं सांगितलं होतं. आता हे थांबलं नाही तर त्यांचेसुद्धा जे शॉर्ट फॉर्म आहेत, त्यांच्या मुलापासून सर्वांचे शॉर्ट फॉर्म मला करावे लागतील.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








