प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. राज्यात बुधवारी 1,71,112 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्या तुलनेत पॉझिटिव्हिटी दर 1.97 टक्के इतका आहे. दिवसभरात 3,382 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, मागील चोवीस तासांत 12,763 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 111 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात आतापर्यंत 28,43,810 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर आतापर्यंत एकूण 27,32,242 जण संसर्गमुक्त झाले आहेत. दरम्यान एकूण 35,040 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. सध्या सक्रिय रुग्णसंख्या 76,505 पर्यंत खाली आली आहे. म्हैसूर, हासन, मंडय़ा आणि मंगळूर जिल्हय़ांमध्ये कोरोना संसर्ग अद्याप कमी झालेला नाही.









