ऑनलाईन टीम
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने शाळा पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहेत. परंतु, आता राज्यातील कोरोनाचे प्रमाण नियंत्रणात येत असल्याने पुन्हा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून त्याबाबत आदेश आणि मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शहरी आणि ग्रामीण भागातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत.
राज्यात ज्या ठिकाणी कोरोना नियंत्रणात आहे, तिथे मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा सुरू होतील. शहरी भागातील कोरोना स्थितीचा विचार करून आठवी ते दहावी शाळा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी निर्णय घेण्याचा अधिकार पालिका आयुक्तांना असणार आहे. तर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांना घ्यावा लागणार आहे. ग्रामीण भागात पाचवी ते सातवी शाळा सुरू करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करण्याच्या निर्णयासाठी महापालिका क्षेत्रात खास समिती गठीत करण्यात येणार आहे. तसेच नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत स्तरावरही जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समीती गठीत होणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








