बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात वाढत्या कोरोना प्रकरणांमुळे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटक सरकारने आणखी एक लॉकडाऊन करण्याचा सल्ला दिला आहे.
सोमवारी कर्नाटकचे माजी सीएम एचडी कुमारस्वामी यांनी लोकांनी कोरोना प्रोटोकॉलचे पालन करणे आणि राज्यात कोरोना प्रकरणात होत असलेली वाढ लक्षत घेता राज्य सरकारने आणखी एक लॉकडाऊन करण्याची सूचना केली.
“माझ्यासह लोक मास्क घालत नाहीत. बरेच लोक सेल्फी काढण्यासाठी माझ्या जवळ येतात जे अगदी भितीदायक आहे, ” असे ते म्हणाले.
दरम्यान, कोरोना प्रकरणांमध्ये झालेल्या वाढीमुळे कर्नाटक सरकारने बेंगळूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला आहे.