बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुरीकडे राज्यात लसीची कमतरता असल्याचे वृत्त ऐकायला मिळत होते. दरम्यान कर्नाटकचे आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी राज्यातील अनेक सार्वजनिक आरोग्य केंद्रांवर कोविड -१९ लस कमी पडायला लागल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे.
“राज्यात लसीची कमतरता नाही. आम्ही यासंदर्भात केंद्राशी चर्चा केली आहे आणि आम्हाला कोणत्याही कमतरतेचा सामना करावा लागणार नाही असे आश्वासन देण्यात आले आहे, असे ते चिक्कबळ्ळापूर येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
आरोग्यमंत्र्यांनी आठवड्यातून राज्यात १२.५लाख डोस लस प्राप्त होईल. “त्यापूर्वी विमानाने अतिरिक्त ४ लाख डोस पाठवले जातील. लसींची कमतरता भासू नये याची सरकार खातरजमा करेल. ” असे ते म्हणाले.









