प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात केवळ कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य खात्याकडून माहिती दिली जाते. मात्र, निगेटिव्ह आलेल्यांना माहिती दिली जात नसल्याची तक्रार होती. पण यापुढे निगेटिव्ह आलेल्यांची माहिती त्या व्यक्तीला एसएमएसद्वारे पाठविण्याची सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सचिव डॉ. अरुंधती चंद्रशेखर यांनी आरोग्य खात्याला केली आहे. राज्यातील सर्व कोरोना चाचणी केंद्राच्या नोडल अधिकाऱयांनी कोरोनाची लागण न झालेल्या व्यक्तीचा अहवाल तात्काळ संबंधिताला एसएमएसद्वारे कन्नड आणि इंग्रजी भाषेत पाठवून द्यावा, असे त्यांनी सांगितले आहेत.









