बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या अफवांविषयी बोलताना त्यांनी, अद्याप राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असे ते म्हणाले.
बेंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणताही विचार केलेला नाही आणि मंत्रिमंडळ विस्ताराची बाब चर्चेला आल्यास कळवू असेही ते म्हणाले.
माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी आणि मंड्याच्या खासदार सुमलाथा अंबरीश यांच्यातल्या तोंडी वादाबद्दल बोलताना येडियुरप्पा म्हणाले की, अशा प्रकारे चिखलफेक करण्यास भाग पाडण्याची गरज नाही. “प्रत्येकाने बांधवांप्रमाणे जगायला शिकले पाहिजे. मंड्या जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एक झाले पाहिजे,” असा सल्ला त्यांनी दिला.









