दिवसभरात 31 हजार 830 नवे रुग्ण
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात महामारी कोरोनाचा संसर्ग वाढतच असून मंगळवारी दिवसभरात तब्बल 31 हजारहून अधिक नव्या बाधितांची भर पडली आहे. मागील चोवीस तासांमध्ये राज्यात 31,830 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 10,793 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात 180 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
बेंगळूरमध्ये मंगळवारी 17,550 बाधितांची नोंद झाली. तर येथे 97 रुग्णांचा बळी गेला आहे. सध्या येथे 2,06,223 सक्रिय रुग्णा आहेत. सक्रिय रुग्णसंख्येत बेंगळूर शहर जिल्हा देशात पहिल्या स्थानावर आहे. याशिवाय बळळरी, बेंगळूर ग्रामीण, मंगळूर, चिक्कबळ्ळापूर, गुलबर्गा, हासन, कोलार, मंडय़ा, तुमकूर, म्हैसूर, विजापूर व रायचूर या जिल्हय़ांमध्ये नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण अधिक आहे.
आरोग्य-कुटुंब कल्याण खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात मागील चोवीस तासांमध्ये 1,70,116 कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण मंगळवारी 18.71 टक्के इतके होते. राज्यात सध्या सक्रिय रुग्णसंख्या 3,01,899 इतकी आहे. त्यापैकी 2,063 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.









