प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढतच असून मंगळवारी तब्बल 6 हजार 150 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 39 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. संसर्गमुक्त होण्याचे प्रमाण समाधानकारक असून मागील 24 तासांत 3 हजार 487 जण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात दिवसभरात 1,02,021 जणांची चाचणी केली असून चाचण्यांच्या तुलनेत नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण 6.02 टक्के इतके आहे. आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात उपचारातील रुग्णसंख्या 45 हजार 107 इतकी आहे. आतापर्यंत 10 लाख 26 हजार 584 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 9 लाख 68 हजार 762 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण 12 हजार 696 जणांचा मृत्यू झाला आहे. गत 24 तासांत बेंगळुरात सर्वाधिक 4 हजार 266 नव्या रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गुलबर्गा जिल्हय़ात 261, म्हैसूर 237, बिदर 167, तुमकूर 157, हासन 110, मंगळूर 89, बळ्ळारी 87 व कारवार जिल्हय़ात 66 नव्या रुग्णांची भर पडली आहे.









