बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात गेल्या २४ तासात राज्यात ३९,९९८ नवीन कोविड रुग्ण आढळले. यासह, राज्यात एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची एकूण संख्या २०,५३,१९१ वर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यात बुधवारी ३४,७५२ रुग्णांनी कोरोनावर मात करत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळविला. राज्यात सध्या ५,९२,१८२ सक्रिय प्रकरणे आहेत. कोविडने आतापर्यंत २०,३६८ जणांचा बळी घेतला आहे. त्यापैकी बुधवारी ५१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.१६ टक्के आणि मृत्यूचे प्रमाण ०.९८ टक्के आहे.
बेंगळूरमध्ये बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवारी जिल्ह्यात १६,२८६ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण ९,९९,८०५ रूग्णांपैकी ६,३०,२२१ रूग्ण संसर्गातून बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या ३,६०,६१९ सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत एकूण ८,९६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील २७५ रुग्णांचा मृत्यू बुधवारी झाला आहे. तर बुधवारी १८,०८९ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवीत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळविला. बेंगळूरमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६३ टक्के व मृत्यूदर ०.८९ टक्के आहे.









