मुंबई / ऑनलाईन टीम
दिवसेंदिवस देशासह राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. कडक निर्बंध लादूनही परिस्थितीत बदलत नाही. त्यामुळे सरकार लॉकडाऊनच्या बाबत विचार करत असल्याची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या, शनिवारी दुपारी सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. कोरोनाबाबत करावयाच्या उपाययोजनाबाबत या बैठकीत उद्या पुन्हा चर्चा होणार आहे.
बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, जयंत पाटील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, राज ठाकरे या बैठकीला उपस्थित असणार आहेत.
“राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनबाबत चर्चा होणार आहे. सध्याची रुग्णसंख्या ही पाच लाख आहे. पुढच्या काही दिवसात ही संख्या दहा लाखांवर गेली तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. त्यामुळे लॉकडाऊनबाबत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत विरोधी पक्षाचं मत घेतलं जाईल”, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








