बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात प्रथमच एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्लाझ्मा ग्रीन कॉरिडोरच्या माध्यमातून पाठविण्यात आला. दोन रुग्णवाहिकांनी बेंगळूरमधील रुग्णालयापासून सुमारे साडेचार तासात चेन्नईच्या खासगी रुग्णालयापर्यंत ३४८ किलोमीटरचा प्रवास केला.
एचसीजी हॉस्पिटलमधील प्लाझ्मा थेरपी क्लिनिकल ट्रायल आणि कॅन्सर पॅथॉलॉजिस्टचे प्रमुख डॉ. विशाल राव यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी संध्याकाळी प्लाझ्मा पाठविला गेला. चेन्नईच्या एका खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर जीवन व मृत्यू दरम्यान अन्य आजारांनी ग्रासलेली आणि कोरोना पॉझिटिव्ह एका वृद्ध माहितीची परिस्थिती लक्षात घेता नातेवाईकांनी प्लाझ्मा थेरपीची इच्छा व्यक्त केली.
चेन्नईतील रुग्णालयाने कर्नाटकमधील एकमेव प्लाझ्मा बँक, एचसीजीसाठी प्लाझ्माची विचारणा केली. सायंकाळी तीन वाजेच्या सुमारास बँकेच्या एका दात्याने प्लाझ्मा दान केला. प्लाझ्मा ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून चेन्नईला पाठविण्यात आला. यासाठी बेंगळूर ट्रॅफिक पोलिसांनी रुग्णवाहिकेला मार्ग दाखविला. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास एचसीजीहून निघालेली रुग्णवाहिका प्लाझ्मा सुरक्षितपणे होसूरला घेऊन गेली जिथे चेन्नई हॉस्पिटलची टीम आधीच प्लाझ्मा घेऊन जाण्याच्या प्रतीक्षेत होती. प्लाझ्मा मिळाल्यानंतर ही टीम रात्री 9.30 च्या सुमारास रुग्णालयात पोहोचली.
डॉ. राव यांनी , राज्यात किंवा दुसर्या राज्यात प्रत्यारोपणासाठी दान केलेल्या अवयवांची वाहतूक करण्यासाठी ग्रीन कॉरिडॉरचा वापर करणे सामान्य आहे, परंतु याद्वारे प्रथमच प्लाझ्मा पाठविला असल्याचे म्हंटले आहे .तसेच दररोज प्लाझ्माची मागणी वाढत आहे. कोरोना बाधित रुग्ण बरे झाल्यांनतर काही काळानंतर प्लाझ्मा दान करू शकतात. जितके लोक प्लाझ्मा दान करतील तितक्या लोकांचा जीव वाचणार असल्याचेही डॉ. राव म्हणाले.









