बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात दररोज वाढणारी कोरोनाची संख्या चिंता वाढवत आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट असूनही, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे ऑनलाइन वर्ग सुरू राहतील आणि या अभ्यासक्रमांच्या परीक्षाही वेळापत्रकानुसार घेण्यात येतील. असे मत उच्च शिक्षणमंत्री डॉ. सी. एन. अश्वथनारायण यांनी म्हंटले.
मंगळवारी उच्च शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी, राज्यातील सर्व विद्यापीठांनी ठरविलेल्या अजेंडानुसार ऑफलाइन वर्ग आणि परीक्षा घेण्यात येतील. त्यात कोणताही बदल होणार नाही, असे म्हंटले.
उच्च शिक्षणमंत्र्यांनी कोरोना साथीच्या दुसर्या लाटेची परिस्थितीत लक्षात घेऊन राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाईल, असे म्हंटले.
उच्च शिक्षण विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली आहे. समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांस आवश्यक मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत.









