बाधितांची संख्या पोहोचली 5452 वर : रविवारी एकाच दिवशी 143 कोरोनामुक्त
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात रविवारी एकाच दिवशी 239 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या 5452 वर पोहाचली आहे. तर बेंगळूर शहर जिल्हय़ातील दोघांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 61 वर पोहोचली आहे. रविवारी 143 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात 2132 जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण खात्यातर्फे देण्यात आली.
देशातील विविध राज्यांमधून आलेल्या नागरिकांमुळे मागील आठवडाभरापासून राज्यात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. प्रामुख्याने यादगिर, गुलबर्गा, उडुपी जिल्हय़ांमध्ये रुग्ण जास्त आहेत. मागील 24 तासात राज्यभरात 239 नवे रुग्ण आढळले असून सर्वाधित रुग्ण गुलबर्गा आणि यादगिरी जिल्हय़ात आढळून आले आहेत. गुलबर्गा आणि यादगिरी जिल्हय़ांमध्ये प्रत्येकी 39, बेळगाव जिल्हय़ात 38, बेंगळूर शहर 23, दावणगेरे 17, मंगळूर 17, उडुपी 13, शिमोगा जिल्हय़ात 12, विजापुरमध्ये 9, बिदर जिल्हय़ांमध्ये 7, बळ्ळारी 6, बेंगळूर ग्रामीणमध्ये 5, हासन 5, धारवाड 3, गदग आणि कारवारमध्ये प्रत्येकी 2, मंडय़ा आणि रायचूर जिल्हय़ात प्रत्येकी 1 नवा रुग्ण आढळून आला आहे.
बेंगळूर शहर जिल्हय़ात 61 वर्षांची महिला मधुमेह आणि रक्तदाबामुळे 29 मे रोजी इस्पितळात दाखल झाली होती. मात्र, 6 जून रोजी तिचा मृत्यू झाला आहे. तर 3 मे रोजी एका 57 वर्षांची व्यक्ती कॅन्सर, मधुमेह आणि रक्तदाबामुळे इस्पितळात दाखल झाली होती, पण 7 जूनला त्याचा मृत्यू झाला आहे.
राज्यात एकूण 5452 कोरोनाबाधितांपैकी 2132 जण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. यापैकी 143 जण रविवारी कोरोनामुक्त झाले. तर 61 जणांचा बळी गेला आहे. 3257 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.









