ऑनलाईन टीम
मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडी आयोजित करण्यास राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज महाराष्ट्रातील गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते.
यावेळी थाटामाटात सण साजरा करण्याची शासनाने परवानगी द्यावी, अशी भूमिका गोविंदा पथकाच्या प्रतिनिधींनी घेतली. परंतु, सध्या कोरोना संकटात जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊ, त्यासाठी सण-वार उत्सव काही काळ बाजूला ठेवून कोरोनाला हद्दपार करू, अशी संयमी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.
गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे राज्यात कोणताही सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आलेला नाही. मागील वर्षी मुंबई, ठाण्यासह राज्यातील गोविंदा पथकांनी दहीहंडी उत्सव साजरा केला नव्हता. यंदा छोट्या प्रमाणात तरी उत्सवाला परवानगी द्यावी. जागेवरच मानाची हंडी फोडू द्यावी, अशी मागणी समन्वय समितीने प्रशासनाकडे केली होती. तसेच गोविंदांना लशीचे दोन डोस पूर्ण करण्याची आणि योग्य ती काळजी घेऊन दहीहंडी उत्सव साजरा करण्याची जबाबदारी आमची असेल, असेही गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींनी सराकारला सांगितले.
दहीहंडी साजरी केल्याने मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रभाव वाढू शकतो, असा इशारा टास्क फोर्सने दिला आहे. त्यामुळे राज्यात दहीहंडी उत्सवाला परवानगी देता येणार नाही. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








